पाच दिवसांनी आली 45 हजार 500 कोविड लस

आजपासून पुन्हा पूर्ण वेळ लसीकरण
पाच दिवसांनी आली 45 हजार 500 कोविड लस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या आठवड्यात बुधवारी (दि.7) जिल्ह्यात करोना लसीकरणासाठी 25 हजार लसचा पुरवठा झाला होता.

त्यानंतर पाच दिवसांनी सोमवार (दि.12) रोजी जिल्ह्यासाठी 45 हजार 500 करोना लसींचा साठा उपलब्ध झाला आहे. आलेला लसींचा साठा जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात वितरित केला असून यामुळे आजपासून जिल्ह्यातील 165 केंद्रावर नियमित लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात 13 जानेवारीपासून करोना लसीकरणाला सुरूवात झालेली आहे.

जिल्ह्यातील नागरिकांसाठी आतापर्यंत कोविड शिल्डचे 3 लाख 3 हजार 590 तर को-वॉक्सिनचे 54 हजार 140 डोस आलेले आहेत. जिल्ह्यासाठी 31 मार्चला सर्वाधिक 54 हजार 700 तर सर्वात कमी 12 फेबु्रवारीला 1 हजार 870 डोस मिळालेले आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यात काही दिवसांत करोना लसीकरणात अनेक ठिकाणी खंड पडल होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com