कुणी लस घेता का, लस..!

जिल्ह्यात 'इतके' डोस शिल्लक
कुणी लस घेता का, लस..!

अहमदनगर | प्रतिनिधी

वारंवार - जनजागृती तसेच आवाहन करूनही करोना प्रतिबंधक लस (corona vaccination) घेण्यासाठी नागरिक पाठ फिरवत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

यासंदर्भात खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनीही अकोलेतील (akole) करोना (covid19) आढावा बैठकीत चिंता व्यक्त केली आहे. तेव्हा जिल्ह्यात लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज आहे. यासाठी गावपातळीवरील ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य कर्मचारी यांनी 9 सातत्यपूर्ण काम करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

लसीकरणासाठी नोंदणी व प्रत्यक्ष लसीकरण यात तफावत होत असल्यानेही अनेक ठिकाणी डोस शिल्लक राहत आहेत.

अहमदनगर (ahmednagar) जिल्ह्यातील करोना रुग्णसंख्या कमी होत आहे. दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या होत आहेत. असे जरी असले तरी अजून करोनाचा धोका पूर्णपणे कमी झालेला नाही. आजही जिल्ह्यात लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक आहेत. त्यामुळे लस घेता का लस.. असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला आहे. नगर जिल्ह्यातही ३२ लाख ५६ हजार डोसचे लसीकरण झाले आहे. यात दुसरा डोस ८ लाख ४४ हजार लोकांनीच घेतला आहे. असे नमूद करून ते म्हणाले, दुसरा डोस घेणारे लोकांची संख्या वाढली पाहिजे यासाठी गावपातळीवरील शासकीय सेवक, सरपंच व लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये जाऊन त्यांना कोवीड लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. लोकांचे समुपदेशन करावे. अशा सूचना करून त्यांनी शासन राबवित असलेल्या मिशन कवच कुंडले व युवा स्वास्थ्य मोहीमेविषयी माहिती दिली. तसेच अकोले येथे उप जिल्हा रुग्णालय निर्माण करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी सादर करावा. अशा सूचनाही मुश्रीफ यांनी यावेळी केल्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com