काळजी घ्या! जिल्ह्यात वेगाने रुग्णवाढ; नगर शहरासह राहाता टॉपला

काळजी घ्या! जिल्ह्यात वेगाने रुग्णवाढ; नगर शहरासह राहाता टॉपला

अहमदनगर | प्रतिनिधी

करोनाच्या दुसर्‍या लाटेच्या (corona second wave) वेळी राज्यासह देश पातळीवर चिंतेचा विषय ठरलेल्या नगर (ahmednagar corona update) जिल्ह्यात आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येसह उपचाराधीन रुग्णसंख्याही (covid19 active patient in ahmednagar) सतत वाढत आहे.

आज जिल्ह्यात ७९५ रुग्णांची नोंद झाली. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये (Corona test lab) ३६०, खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३१० आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) १२५ रुग्ण बाधीत आढळले.

काळजी घ्या! जिल्ह्यात वेगाने रुग्णवाढ; नगर शहरासह राहाता टॉपला
सोनाली कुलकर्णीचा मकरसंक्रातीनिमित्तचा लूक पाहिलात का...

कुठे किती रुग्ण?

मनपा - २००

राहाता - १३४

अकोले - ५२

कोपरगाव - ५२

नगर ग्रामीण - ४७

पारनेर - ४६

मिलिटरी हॉस्पिटल - ३७

शेवगाव - ३२

संगमनेर - ३०

श्रीरामपूर - ३०

इतर जिल्हा - २७

पाथर्डी - २७

श्रीगोंदा - २६

नेवासा - २३

जामखेड - १०

कर्जत - ०९

राहुरी - ०७

भिंगार कॉंटेन्मेन्ट - ०३

इतर राज्य - ०३

करोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत असल्याने राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहे. जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोमवारपासून निर्बंध लागू केले आहे. निर्बंध लागू केले असले तरी त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. दुसरीकडे रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com