Corona Update: जिल्ह्यात रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच; संगमनेर, पारनेर टॉपवर

Corona Update: जिल्ह्यात रुग्णसंख्येत चढ-उतार सुरूच; संगमनेर, पारनेर टॉपवर
कराेना रुग्ण

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यातील करोना संसर्ग (Corona) काही प्रमाणात आटोक्यात येताना दिसत होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे. दरम्यान आज नव्या रुग्णसंख्येत वाढ झाली असून नगरकरांची चिंता कायम आहे. (Ahmednagar Corona Update)

आज जिल्ह्यात ८७५ रुग्णांची नोंद (COVID19 patient) झाली. जिल्हा रुग्णालयाच्या (District Hospital) करोना टेस्ट लॅबमध्ये ३१६ (Corona Test Lab), खाजगी प्रयोगशाळेत (Private lab) केलेल्या तपासणीत ३०९ आणि अँटीजेन चाचणीत (Antigen test) २५० रुग्ण बाधीत आढळले.

कुठे, किती रुग्ण?

संगमनेर - १९४

पारनेर - १४०

श्रीगोंदा - ८३

कर्जत - ६४

अकोले - ५५

नेवासा - ५०

कोपरगाव - ४१

शेवगाव - ३८

नगर ग्रामीण - ३६

पाथर्डी - ३४

राहुरी - ३३

श्रीरामपूर - २८

मनपा - २३

जामखेड - २२

राहाता - १७

इतर जिल्हा - १४

मिलिटरी हॉस्पिटल - ०३

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com