अहमदनगर : महसूलच्या 96 अधिकारी-कर्मचार्‍यांना करोनाने घेरले

55 जणांची मात : 39 वर उपचार सुरू
 

अहमदनगर : महसूलच्या 96 अधिकारी-कर्मचार्‍यांना करोनाने घेरले

अहमदनगर (प्रतिनिधी) -

करोना महामारीच्या काळात आरोग्य खात्याच्या खांद्याला खांदा लावून भूमिका बजावणार्‍या महसूल विभागातील 96 अधिकारी-कर्मचार्‍यांना करोनाने

घेरले आहे. यातील 55 जणांनी करोनावर यशस्वी मात केली असून अद्याप 39 जणांचा करोनाशी लढा सुरू आहे.

जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाशी समन्वयाची भूमिका ठेवून काम करणारा महसूल विभागही करोनाच्या विळख्यात आहे. यात श्रीगाेंंदा-पारनेर विभागातील एक जण बरा झाला असून एकावर उपचार सुरू आहे. पाथर्डी उपविभागात एकावर उपचार सुरू आहेत. श्रीरामपूर विभागात एकजण बरा झाला आहे. शिर्डी विभागात एक तर नगर तहसील कार्यालयात 2, नेवासा तहसीलमध्ये 8, श्रीगोंदा तहसीलमध्ये 7, पारेनर तहसीलमध्ये 2, पाथर्डी तहसीलमध्ये 14, शेवगाव तहसीलमध्ये 5, संगमनेर तहसीलमध्ये 19, श्रीरामपूर तहसीलमध्ये 3, राहुरी तहसीलमध्ये 2, कर्जत तहसीलमध्ये 1 जामखेड तहसीलमध्ये 9, कोपरगाव 2 आणि राहातामध्ये 3 जण करोना बाधित आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल शाखेत 2, भूमापन शाखेत 1, सामान्य प्रशासन विभागात 3, पुरवठा विभागात 1, पुर्नवसन विभागात 2, निवडणुक विभागात 1, जिल्हाधिकारी यांच्या स्विय साहयक कक्षात 1, नगरपालिका विभागात 3 असे करोना बाधित असून यापैकी 55 जणांनी करोनावर मात केली असून 39 जणांवर उपचार सुरू आहेत.

..............

जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांंना करोनाची लागण होत आहे. मागील आठवड्यात दोन विभाग प्रमुखांसह काही कर्मचार्‍यांचा यात समावेश आहे. जिल्हा परिषदेत कर्मचार्‍यांची उपस्थिती 50 टक्के करण्यात आली असून आरटीपीसीआर रिपोर्ट असणार्‍यांना जिल्हा परिषदेत प्रवेश आहे.

.................

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com