अहमदनगर (प्रतिनिधी) - होळीला 1228 अन् धुराडीला 1347 जणांना कोरोनाची बाधा झाली. या आकड्याने नगरकरांच्या चिंतेत भर पडली असून कोरोना नियमांचे पालन करण्याची गरज बनली आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकड्याने आज मार्च महिन्यात सर्वाधिक बाधितांचा विक्रम नोंदविला. मागील 24 तासांमध्ये 1 हजार 347 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचा रिपोर्ट जिल्हा प्रशासनाकडून बाहेर पडला. आज सोमवारी बाधितांमध्ये सर्वाधिक 453 बाधित हे नगर शहरातील आहेत. त्यानंतर राहाता, कोपरगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची नोंद झाली आहे. सिव्हील हॉस्पिटलच्या लॅबमधून 753, खाजगी लॅबमधून 454 आणि रॅपिड अँटीजनमधून 148 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाले आहेत.

भिंगार आणि मिलिटरीतही...

भिंगारमध्येही आज 26 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला. मिलिटरी एरियामध्ये असलेल्या भिंगारमध्ये 26 आणि मिलिटरीच्या कॅम्पसमध्येही तिघांना कोरोनाची बाधा झाली आहे.

टुडेज स्कोअर

अहमदनगर शहर 453, राहाता 116, संगमनेर 90, श्रीरामपूर 75, नेवासे 18, नगर तालुका 68, पाथर्डी 92, अकोले 21, कोपरगाव 102, कर्जत 07, पारनेर 26, राहुरी 49, भिंगार 26, शेवगाव 66, जामखेड 60, श्रीगोंदे 60, मिलिटरी रुग्णालय 03 आणि इतर जिल्ह्यातील 16