खासगीत निगेटिव्ह, सिव्हीलला पॉझिटिव्ह
सार्वमत

खासगीत निगेटिव्ह, सिव्हीलला पॉझिटिव्ह

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सकाळीच चेक केलेला खासगी लॅबचा करोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर काही वेळातच सिव्हीलमधून पॉझिटिव्ह रिपोर्ट बाहेर पडला. सावेडीतील एकाच महिलेचे दोन रिपोर्ट पाहून नगरमध्ये अजूनही गोंधळ सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

नगर शहरात करोनाचा पार्दुभाव वाढत असून तपासणीला रांगा लागल्या आहेत. सावेडीतील 46 वर्षाची महिलाही तपासणीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. रविवारी (दि.16) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास त्यांनी सिव्हीलमध्ये स्वॅब दिला. स्वॅब येण्यास विलंब होईल असे गृहीत धरून त्यांनी सोमवारी सकाळी खासगी लॅबमध्ये धाव घेतली. तेथे स्वॅब तपासणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला.

सकाळी बारा वाजेच्या सुमारास निगेटिव्ह अलेल्या या रिपोर्टमुळे महिलेला हायसे वाटले. त्याच रात्री सिव्हीलच्या लॅबमधून त्यांचा रिपोर्ट मात्र पॉझिटिव्ह निघाला. एकाच महिलेचे दोन रिपोर्ट पाहून ती करोनाबाधित आहे की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. आता सिव्हीलचा रिपोर्ट खरा मानयाचा की खासगी लॅबचा असा प्रश्न तिच्यासमोर पडला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com