अहमदनगर (प्रतिनिधी) - साखरपुडा, लग्न करताना त्या त्या पोलीस ठाण्याच्या अधिकार्याची पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे करण्यात आले आहे. कोरोना नियम आणि या आदेशाचे उल्लंघन केल्यास 10 हजारांचा दंड आयोजकांच्या माथी पडणार आहे. सोमवारपासून (29 मार्च) पुढील आदेश येईपर्यंत लग्नसमारंभासाठी परवानगीची अट कायम असणार आहे. तसे आदेश आज शुक्रवारी राजेंद्र भोसले यांनी काढले आहेत.

कोरोना नियंत्रण आणि प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कलेक्टरांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. कलेक्टरांनी विवाह समारंभास 50 वर्हाडींनाच एकत्र येण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 10 हजार रुपयांचा दंड आकारणी करूनही पालन होत नसल्याने कलेक्टरांनी आता पूर्वपरवानगीची अट टाकली आहे. पूर्वपरवानगी घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी होते की नाही, याची पाहणी पोलीस करणार आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास कलम 188 अन्वये कारवाई केली जाणार आहे.

पोलिसांवर जबाबदारी

लग्न, साखरपुड्याला परमिशन देणे आणि दिलेल्या परमिशननुसार धार्मिक समारंभ होतात की नाही ही पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर टाकण्यात आली आहे. अधिकार्यांनी एसपींना आणि एसपींनी केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. पोलीस नाईक ते निरीक्षक दर्जाचे अधिकारी लग्न समारंभाची पाहणी करून कारवाई करणार आहेत.

आज 829 वाढले

नगर जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या आकड्यांत 829ची भर पडली. सर्वाधिक बाधित नगर शहरातील असून 239 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्या खालोखाल कोपरगाव 89, राहाता 81, नगर तालुका 74, श्रीरामपूर 55, नेवासा 52, पारनेर 48, संगमनेर 37, कर्जत 32, राहुरी 30, पाथर्डी 29, पारनेर 48, अकोले 27, श्रीगोंदा 10, भिंगार 9, जामखेड 4, शेवगाव 2 असे बाधित वाढले.