करोनाची अचानक उसळी !

जिल्ह्यात 59, तर नगर शहरात 19 नवे बाधित
करोना
करोना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात अचानक करोना रुग्ण (Corona Patient) संख्या वाढू लागली आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने (District Administration) देण्यात आलेल्या आकडेवारीत नव्याने 59 करोना रुग्ण वाढले असून नगर शहरात मनपा हद्दीत 19 रुग्णांची भर पडली आहे. लसीकरणाकडे (Vaccination) पाठ, बुस्टर डोस घेण्यास टाळाटाळ आणि करोना नियमांचे (Corona Rules) पालन न करणे यामुळे करोना फैलाव होत असल्याचे समोर आले आहे.

गेल्या आठ दिवसांपासून हळूहळू जिल्ह्यात आणि नगर शहरात (Nagar City) करोना रुग्ण (Corona Patient) संख्या वाढत आहे. जिल्ह्यात 36 लाख 36 नागरिकांपैकी पाच लाखांच्या जवळपास नागरिकांनी करोनाचा एकही डोस (Dose) घेतलेला नाही. त्यांच्यासाठी वाढणारी करोना संख्याही चिंतेची बाब आहे. दुसरीकडे नव्याने समोर येणारे करोना रुग्णांना गंभीर स्वरूपाची लक्षणे नसली तरी झपाट्याने वाढणारी करोना संख्याही पुन्हा डोकदुखी ठरण्याची शक्यता नाकारात येत नाही.

नगर शहरात मनपा हद्दीत मंगळवारी नव्याने 19 करोना रुग्णसमोर आल्याने मनपा आरोग्य विभागाने वेळी दक्षता घेण्याची वेळ आली आहे. राज्यात पुण्यात करोनाचे रुग्ण वाढत असून नगरकरांनी करोना नियमांचे पालन आणि लसीकरण न केल्यास त्याचा फटका बसू शकतो. यामुळे सर्वांनी दक्ष राहण्याची आवश्यकता आहे.

नगर शहर - 19

शेवगाव - 08

राहुरी - 05

नगर तालुका - 04

संगमनेर - 04

पारनेर - 03

राहाता - 03

अकोले - 02

भिंगार - 02

जामखेड - 02

श्रीगोंदा 02

मिलिटरी 01

नेवासा 01

परजिल्हा 03

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com