करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.37 टक्क्यांवर

758 बाधितांची भर : 5 हजारांवर सक्रीय रुग्ण
करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.37 टक्क्यांवर

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.37 टक्क्यांवर पोहचले आहे. काल 758 बाधित वाढले. उपचार सुरू असणार्‍या सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 479 आहे. काल 835 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. करोनातून बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 23 हजार 173 झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये 106, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 412 आणि अँटीजेन चाचणीत 240 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 7, जामखेड 9, कर्जत 1, नगर ग्रामीण 11, नेवासा 3, पारनेर 21, पाथर्डी 7, राहुरी 1, संगमनेर 02, शेवगाव 1, श्रीगोंदा 38, कँटोन्मेंट बोर्ड 2, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि अन्य जिल्ह्यातील 2 रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर मनपा 10, अकोले 25, जामखेड 2, कर्जत 19, कोपरगाव 20, नगर ग्रामीण 30, नेवासा 30, पारनेर 15, पाथर्डी 10, राहाता 55, राहुरी 27, संगमनेर 80, शेवगाव 52, श्रीगोंदा 13, श्रीरामपूर 19 आणि अन्य जिल्ह्यातील 5 रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 240 जण बाधित आढळले. अकोले 24, जामखेड 12, कर्जत 27, कोपरगाव 15, नगर ग्रामीण 9, नेवासा 17, पारनेर 37, पाथर्डी 17, राहाता 10, राहुरी 33, संगमनेर 15, शेवगाव 04, श्रीगोंदा 14, श्रीरामपूर 4 आणि अन्य जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे.

835 रुग्णालयातून घरी

मनपा क्षेत्रातील 17, अकोले 71, जामखेड 22, कर्जत 48, कोपरगाव 18, नगर ग्रामीण 26, नेवासा 58, पारनेर 99, पाथर्डी 43, राहाता 22, राहुरी 27, संगमनेर 215, शेवगाव 61, श्रीगोंदा 74, श्रीरामपूर 20, कँटोन्मेंट बोर्ड 7 व अन्य जिल्ह्यातील 7 अशा एकूण 835 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com