चिंताजनक! जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली, आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद

पारनेर, पाथर्डी व श्रीगोंदा टॉपला
चिंताजनक! जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली, आज सातशेहून अधिक रुग्णांची नोंद

अहमदनगर | Ahmednagar

जिल्ह्यात गुरूवारी 454 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 2 लाख 81 हजार 238 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.57 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल जिल्ह्याच्या रूग्ण संख्येत 789 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3 हजार 891 इतकी झाली आहे.

दरम्यान, पारनेर तालुक्यात काल नव्याने 158 रुग्ण सापडले असून नव्याने पाथर्डी श्रीगोंदा आणि कर्जत तालुक्यात करोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 246, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 200 आणि अँटिजेन चाचणीत 343 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 4, अकोले 10, जामखेड 9, कर्जत 4, नगर ग्रामीण 15, पारनेर 97, पाथर्डी 45, राहुरी 3, संगमनेर 27, श्रीगोंदा 29, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 2 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 13, अकोले 11, जामखेड 27, कर्जत 19, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 8, नेवासा 16, पारनेर 13, पाथर्डी 1, राहता 11, राहुरी 1, संगमनेर 21, शेवगाव 36, श्रीगोंदा 3, श्रीरामपूर 10, कँटोन्मेंट बोर्ड 1 आणि इतर जिल्हा 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 343 जण बाधित आढळून आले. मनपा 14, अकोले 15, जामखेड 19, कर्जत 58, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 9, नेवासा 13, पारनेर 48, पाथर्डी 42, राहता 7, राहुरी 8, संगमनेर 18, शेवगाव 12, श्रीगोंदा 55, श्रीरामपूर 4, कँटोन्मेंट बोर्ड 2 आणि इतर जिल्हा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 24, अकोले 15, जामखेड 13, कर्जत 15, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 42, नेवासा 24, पारनेर 55, पाथर्डी 52, राहता 43, राहुरी 10, संगमनेर 42, शेवगाव 52, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 19, कँटोन्मेंट बोर्ड 3 आणि इतर जिल्हा 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

तालुकानिहाय सक्रिय रुग्ण

पारनेर 158, पाथर्डी 88, श्रीगोंदा 87, कर्जत 81, संगमनेर 66, जामखेड 55, शेवगाव 48, अकोले 36, नगर ग्रामीण 32, मनपा 31, नेवासा 29, कोपरगाव 22, राहाता 18, श्रीरामपूर 14, राहुरी 12, अन्य जिल्हा 8, भिंगार 3, लष्कर रुग्णालय 1 असे आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com