COVID19 : जिल्ह्यात आज ४७५ रूग्णांना नोंद; ‘एवढ्या’ रूग्णांवर उपचार सुरु

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के
COVID19 : जिल्ह्यात आज ४७५ रूग्णांना नोंद; ‘एवढ्या’ रूग्णांवर उपचार सुरु
File Photo

अहमदनगर | प्रतिनिधी

जिल्ह्यात आज ४०१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ७४ हजार २९ इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २ हजार ५५९ इतकी झाली आहे.

File Photo
भामाठाणच्या तरुणाने अल्पवयीन मुलीला पळविले

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये २१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९४ आणि अँटीजेन चाचणीत २६० रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०६, कर्जत ०१, नगर ग्रा. ०४, पारनेर ०२, राहुरी ०१, संगमनेर ०३, श्रीगोंदा ०२ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

File Photo
भयंकर! लहान मुलाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, अकोले ०१, जामखेड ०४, कर्जत ११, कोपरगाव ०८, नगर ग्रा.१३, नेवासा ११, पारनेर ०७, पाथर्डी २४, राहता १५, राहुरी २१, संगमनेर १८, शेवगाव १६, श्रीगोंदा २८, श्रीरामपूर ०३ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २६० जण बाधित आढळुन आले. मनपा ०७, अकोले १२, जामखेड १९, कर्जत १९, कोपरगाव ११, नगर ग्रा. ०९, नेवासा १३, पारनेर ३९, पाथर्डी १७, राहाता १५, राहुरी १७, संगमनेर २९, शेवगाव ०५, श्रीगोंदा ३६, श्रीरामपूर ०९ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

File Photo
राळेगणसिद्धीतील सर्व नागरिकांची होणार 'करोना टेस्ट'

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ०८, अकोले २१, जामखेड १६, कर्जत २५, कोपरगाव १२, नगर ग्रा. १७, नेवासा १९, पारनेर ६२, पाथर्डी २९, राहता १९, राहुरी २९, संगमनेर २०, शेवगाव ३३, श्रीगोंदा ६१, श्रीरामपूर २२, कॅंटोन्मेंट बोर्ड ०१ आणि इतर जिल्हा ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील स्थिती काय?

बरे झालेली रुग्ण संख्या : २,७४,०२९

उपचार सुरू असलेले रूग्ण : २५५९

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ५९४०

एकूण रूग्ण संख्या : २,८२,५२८

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com