हॉटेलची भट्टी थंडावलेलीच!

व्यवसायाच्या उभारीबाबत चालक आशावादी
हॉटेलची भट्टी थंडावलेलीच!

अहमदनगर | प्रतिनिधी

हॉटेलिंगवरील (Hotel) निर्बंध हटवत व्यवसाय करण्यासाठी रात्री 10 पर्यंत मुभा मिळाल्यानंतरही या व्यवसायाची ‘भट्टी’ थंंडावलेली आहे. गेल्या 5 दिवसांतील व्यवसायाचे चित्र आशादायी नाही. ग्राहकांची (Customer) कमी, कामगारांची (Worker) वाणवा, महागाईची (Inflation) झळ आणि हॉटेल व्यवस्थापनाचा (Hotel management) वाढता खर्च या आव्हानांनी व्यावसायिकांवर पुनर्विचाराची वेळ आणली आहे. विशेष म्हणजे अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी अद्याप हॉटेल किंवा रेस्टॉरंट (Restaurant) सुरूच केलेले नाही. आगामी काळात व्यवसाय स्थिर होईल, असा आशावाद हॉटेल चालक-मालक बाळगून असले तरी नव्या आव्हानांची जाणीवही होऊ लागली आहे.

हॉटेलची भट्टी थंडावलेलीच!
पारनेर तहसीलदारांच्या 'त्या' ऑडिओ क्लिपवरुन भाजपा आक्रमक

नगर शहर खवय्यांसाठीही प्रसिद्ध आहे. ऐकेक पदार्थावरील नगरी छाप नगरकर अभिमानाने मिरवतात. करोनाआधी (Before Corona) हा व्यवसाय भरभराटीला होता. चहापासून कॅफेपर्यंत आणि बारपासून फॅमिली गार्डन रेस्टॉरंटपर्यंत दरवर्षी अनेक हॉटेल व्यावसायिकांची भर पडत होती. जिल्ह्यात एकूण 578 परमीटबार तर सुमारे अडीच ते तीन हजार छोटी-मोठी हॉटेल्स आहेत. मात्र करोनाच्या लॉकडाऊनने अन्य व्यवसायांसोबत हॉटेल व्यवसायाला फटका बसला. राज्यात काही जिल्ह्यात हॉटेलींसाठी वेळ वाढवून मिळाल्यानंतरही नगर जिल्ह्यात मात्र सायंकाळी 4 च्या बंधनाने हॉटेलींगही मर्यादीत होते. मात्र 15 ऑगस्टपासून खाद्य पदार्थांच्या स्टॉलपासून हॉटेलपर्यंत सर्वांनाच रात्री 10 पर्यंत परवानगी मिळाल्यानंतर परिस्थिती झपाट्याने बदलण्याची अपेक्षा होती. त्यासाठी हॉटल संघटनाही वेळ वाढवून मिळवून घेण्यासाठी प्रयत्नशील होती.

मात्र वेळ वाढवून मिळाल्यानंतरही आव्हानांची मालिका संपलेली नाही, हे स्पष्ट झाले आहे. नगर शहरासह शहराबाहेर पडणार्‍या मार्गांवरील अनेक लहान-मोठी हॉटेल्स अद्यापही बंदच आहेत. काहींची स्थिती पुन्हा सुरू होण्यासारखी नाही. काही हॉटेल्स्ना ‘बियरबार’चा पुरक व्यवसाय असल्याने त्यांची अवस्था बरी आहे. तरीही घसरलेल्या व्यवसायाने त्यांच्याही माथ्यावर काळजीच्या रेषा उमटल्या आहेत.

हॉटेलची भट्टी थंडावलेलीच!
ध्येयवेड्या प्रणाली चिकटेचा १० हजार किमीचा थक्क करणारा प्रवास...

दस का पाँच!

करोना काळात सेवा आणि व्यवसाय यांचे मिश्रण म्हणून अनेकांनी पार्सल सुविधा सुरू ठेवली. यात मोठा व्यवसाय नसला तरी किमान हॉटेलची भट्टी विझणार नाही, हा विचार अनेकांनी केला. आता अनलॉक झाल्यानंतरही व्यवसायाला गती मिळालेली नाही. करोनाआधी दिवसाला 10 हजार रूपयांची उलाढाल आज पाच हजारांच्या आत आली आहे, असे एका व्यावसायिकाने सांगीतले.

भाडे द्यावे कसे?

अनेक हॉटेल्स भाडेतत्त्वावर चालवली जात होती. पूर्वी व्यवसाय चांगला असल्याने भाडे दिल्यावरही व्यवस्थापन खर्च परवडत होता. मात्र दीड वर्षांच्या करोना निर्बंधांनी व्यवसायाचे कंबरडे मोडले. त्यामुळे आता हॉटेलचे भाडे देणेही शक्य नाही, हे लक्षात आल्याने अनेकांसमोर हॉटेल व्यवसायात पुन्हा यावे की नाही, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

चैन आवाक्याबाहेर

करोनाने देशाच्या अर्थकारणाला जबर धक्का दिला. अनेकांचे रोजगार गेले आणि अनेकांचे उत्पन्न कमालीचे घटले. त्याचा थेट परिणाम अन्य व्यवसायांसह हॉटेल व्यवसायातील ग्राहकीवरही झाला. बदल म्हणून महिन्यातून एकदोन वेळा हॉटेलकडे वळणारी मध्यमवर्गीय किंवा निम्न मध्यमवर्गीय कुटुंबे आता हॉटेलपासून दुरावली आहेत. घटलेले उत्पन्न हे त्यामागील मुख्य कारण आहे. सोबतच हॉटेलमध्ये होणारे लहान-मोठे पारिवारीक समारंभ अद्यापही सुरू झालेले नाहीत.

हॉटेलची भट्टी थंडावलेलीच!
१० लाखासाठी भाडेकरूनेच केला घरमालकाच्या अपहरणाचा प्रयत्न, पण...

कामगार टंचाई

हॉटेल्समध्ये स्वयंपाक आणि वाढपी अशी दोन महत्त्वाची कामे असतात. नगर शहरातील अनेक हॉटेल्समध्ये या दोन बाजू सांभाळणारे कुशल मनुष्यबळ परप्रांतीय होते. हे कामगार पुन्हा कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे अनेक हॉटेल चालकांची अडचण झाली आहे. करोनाच्या भितीचे वातावरण पूर्ण निवळल्याशिवाय कामगार परतण्याची शक्यता धूसर आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com