Corona
Corona
सार्वमत

नगर : १२ नवे रुग्ण वाढले

जिल्ह्यात करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या झाली २८३

Anant Patil

अहमदनगर ( प्रतिनिधी ) -आज जिल्ह्यात आणखी १२ करोना बाधित रुग्ण आढळून आले.यामध्ये संगमनेर तालुक्यातील ०६, नगर शहरात ०४ तर अकोले आणि पारनेर तालुक्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

जिल्ह्यातील १० रुग्णांनी आज करोनावर मात केली. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, संगमनेर ०५, नगर मनपा ०२, पारनेर, नगर आणि अकोले तालुका प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता २८३ इतकी झाली आहे.

-संगमनेर तालुक्यात कुरण येथे ०२, पिंपरणे आणि साकुर येथे ०१ आणि संगमनेर शहरात हुसेननगर आणि लखमिपुरा येथे एक बाधित रुग्ण आढळून आला.

-नगर शहरात सिद्धार्थ नगर, भिंगार, नवनागापुर आणि केडगाव येथे बाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी, केडगाव येथील रुग्ण ठाण्याहून आला होता

-पारनेर तालुक्यातील गोरेगाव आणि अकोले शहरातील कांदा मार्केट येथे प्रत्येकी एक बाधित रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील अॅक्टिव रुग्ण संख्या आता ११३ झाली असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com