नगर अर्बन बँकेच्या खातेदारांना दिलासा

15 जूनपर्यंत खात्यातील रक्कम परत मिळणार
नगर अर्बन बँकेच्या खातेदारांना दिलासा
नगर अर्बन बँक

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगर अर्बन बँकेमधील (Nagar Urban Bank) खात्यांमधील रक्कम व ठेवी पुन्हा मिळण्यासाठी बर्‍याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या अर्बन बँकेच्या खातेदारांना दिलासा मिळणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने डिपॉझिट इन्शुरन्स अँण्ड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशन द्वारे मिळणार्‍या दुसर्‍या टप्याला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या दि.15 जून दरम्यान अर्बन बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यातील रक्कम परत मिळणार आहे, अशी माहिती अर्बन बँकेचे चेअरमन राजेंद्र अग्रवाल यांनी दिली.

डिपॉझिट इन्शुरन्स अँण्ड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनच्या नियमानुसार मार्च महिन्यात पहिल्या टप्यात खातेदारांना रक्कमा परत करण्यात आल्यानंतर बँकेने वारंवार भारतीय रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा केल्यानंतर डिपॉझिट इन्शुरन्स अँण्ड क्रेडीट गॅरंटी कॉर्पोरेशनचा दुसरा टप्पा मंजूर झाला आहे. यावेळी अर्बन बँकेतील 7813 खात्यांमधील सुमारे 120 कोटीपर्यंतच्या रक्कमा परत मिळण्यास सुरवात होत आहे, अशी माहिती बँकेच्या व्हाईस चेअरमन दीप्ती गांधी यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com