महागाईने त्रस्त महिलांनी केंद्राला दाखवल्या गौऱ्या

गॅस दरवाढीचा निषेध । महिला काँग्रेसचे पंतप्रधानांना पत्र
महागाईने त्रस्त महिलांनी केंद्राला दाखवल्या गौऱ्या

अहमदनगर (प्रतिनिधी)

अहमदनगर (Ahmednagar) शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने (Congress) महागाई नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचा (Central Govt) निषेध म्हणून शेणाच्या गौऱ्या हातात धरत निदर्शने करण्यात आली. तसेच पंतप्रधानांना गॅस दरवाढ कमी करण्यासाठी पत्र पाठविले आहे.

महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष महिन्यामध्ये मोठी गॅस दरवाढ उषाताई भगत, स्नेहलताई काळे, करण्यात आली होती. मे महिन्यामध्ये मोठी गॅस दरवाढ करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा पन्नास रुपयांची दरवाढ करण्यात आली असून आता गॅससाठी नागरिकांना १०५३ रुपये एवढी मोठी रक्कम मोजावी लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशावरून नगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्यावतीने गॅस दरवाढीच्या निषेधासाठी मोहीम राबविण्यात आली. यावेळी शारदाताई कर्डिले, रोहिणी कदम, पूजा वाबळे, मनोरमा बुलाखे आदींसह महिलांनी गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली.

पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रामध्ये महिला काँग्रेसने म्हटले आहे की, देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच गॅस दर प्रचंड वाढले असून गगनाला भिडले आहेत. कोरोना महामारीमुळे बसलेल्या आर्थिक धक्क्यांमधून अजूनही नागरिक सावरलेले नाहीत. मासिक उत्पन्न घटले आहे. केंद्र सरकारने गॅसच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे महिला वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे. परमेश्वर केंद्र सरकारला गॅसची दरवाढ तातडीने कमी करण्याची सद्बुद्धी देवो, असे देखील पत्रात म्हटले आहे.

'ते' आंदोलक कुठे गायब ?

भारतीय जनता पार्टी सत्तेत नसताना थोडी जरी गॅस दरवाढ झाली तर भारतीय जनता पार्टीचे नेते, महिला, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने, आंदोलन करायचे. आता तर देशात भाजपची सत्ता आहे. तरी सुद्धा दरवाढ वेगाने होतच आहे. त्यावेळी आंदोलन करणारे भाजपचे नेते, कार्यकर्ते आता कुठे गायब झाले आहेत? असा सवाल महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com