काँग्रेसकडून भुजबळांना शिस्तभंग नोटीस

शहर काँग्रेसचा वाद प्रदेश पातळीवर पोहोचला
काँग्रेसकडून भुजबळांना शिस्तभंग नोटीस

अहमदनगर (प्रतिनिधी)

शहर काँग्रेसमधील (Ahmednagar Congress) वाद प्रदेश समितीपर्यंत पोहचला आहे. पक्षाची आंदोलन आणि धोरणांविरोधात भूमिका घेत असल्याबद्दल माजी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ (Former city president Balasaheb Bhujbal) यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पक्षांतर्गत वादात भर पडली आहे.

नगर शहर विद्यमान शहर काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) विरूद्ध माजी शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ (Balasaheb Bhujbal) असा सामना अनेक महिन्यांपासून रंगला आहे. भुजबळ गटाने आपलाच गट निष्ठावंत असल्याचा दावा करत काळेंच्या अनेक राजकीय भुमिकांना विरोध केला आहे. काळे हेच काँग्रेसला (Congress) बदनाम करत असल्याचा आरोप करून त्यांनी आपला विरोध अधिक तीव्र केला आहे.

मात्र आता त्यांना पक्षाने शिस्तभंगाची नोटीस पाठवली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सुचनेवरून भुजबळ यांना प्रदेश उपाध्यक्ष भा.ई. नगराळे यांनी शिस्तभंगाचे पत्र पाठवले आहे. आपली भुमिका पक्षविरोधी असून शिस्तभंग केल्याप्रकरणी निलंबित का करू नये, याचा खुलासा मागविण्यात आला आहे.

पक्षशिस्त म्हणून प्रदेश उपाध्यक्षांच्या पत्राला उत्तर देणार आहे. नगर शहरातील काँग्रेसमध्ये काय सुरू आहे, हे प्रदेश संघटनेला कळविण्याची संधी म्हणून याकडे पाहतो. यानिमित्ताने आमच्या भावना प्रदेश पातळीवरील नेत्यांना कळविणार आहोत.

- बाळासाहेब भुजबळ

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com