कंगाल सत्ताधार्‍यांचा तुघलकी करबोजा...; का झाली काँग्रेस आक्रमक?

कंगाल सत्ताधार्‍यांचा तुघलकी करबोजा...; का झाली काँग्रेस आक्रमक?

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

अडीच वर्षांच्या सत्ताकाळात आर्थिक नियोजनशून्यतेमुळे (Lack of financial planning) मनपा सत्ताधार्‍यांनी मनपाची (AMC) वाट लावली. या दिवाळखोरीमुळे महापालिकेला (Ahmednagar Municipal Corporation) कंगाल करणार्‍या सत्ताधार्‍यांनी तिप्पट करवाढीचा घाट घातला आहे. करोनामुळे (Corona) आधीच पिचलेल्या सामान्य नगरकरांना वेठीस धरण्यासाठी मनपा सत्ताधारी आणि शहराच्या लोकप्रतिनिधींचा हा तुघलकी प्रस्ताव असल्याचा आरोप करून काँग्रेसने (Congress) याविरोधात दंड थोपटले आहेत.

कंगाल सत्ताधार्‍यांचा तुघलकी करबोजा...; का झाली काँग्रेस आक्रमक?
महापालिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाने सामाजिक संघटनाही संतप्त

तिप्पट करवाढीच्या प्रस्तावाविरोधात काँग्रेसच्यावतीने घरोघरी जात नगर शहरात 1 लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविणार असल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी सांगीतले. गुरुवारी मनपाची ऑनलाइन महासभा होत आहे. या महासभेमध्ये तिप्पट करवाढीचा प्रस्ताव असल्याच्या कारणावरून शहराचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. तिप्पट करवाढीला काँग्रेसने विरोध सुरू केला आहे. शहरातील मध्यमवर्गीय, गोरगरीब, धनिक सुद्धा मनपा प्रशासनाच्या आडून तिप्पट करवाढीचा प्रस्ताव महासभेत सत्ताधार्‍यांकडून ठेवलाच कसा जातो, असा सवाल काळे यांनी उपस्थित केला आहे.

या प्रस्तावास विरोध न करणारे शहराचे आमदार, मनपा पदाधिकारी, नगरसेवकांच्या दारावर नागरिकांच्यावतीने काँग्रेस निषेधाची पत्रके चिकटविणार असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. महापालिकेत सत्तेसाठी सोयर्‍या-धायर्‍याची नुरा कुस्ती सुरू असते. मात्र आता काँग्रेस नगरकरांच्या प्रश्नावर गप्प बसणार नाही, असे काळे यांनी म्हटले आहे.

कंगाल सत्ताधार्‍यांचा तुघलकी करबोजा...; का झाली काँग्रेस आक्रमक?
उगाच गेट वाजवू नका... उपमहापौरांच्या कानपिचक्या कोणाला?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com