शहरासह उपनगरांतील पाणीपुरवठा विस्कळीत

वीजपुरवठा खंडीत झाल्याचा परिणाम
पाणी पुरवठा
पाणी पुरवठा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वीजपुरवठा खंडीत (Power Outage) झाल्यामुळे शहरास पाणीपुरवठा (Water Supply) करणार्‍या टाक्या भरता आल्या नाहीत. त्यामुळे मध्यवर्ती शहरासह सावेडी (Savedi), केडगाव (Kedgav), बोल्हेगाव (Bolhegav), कल्याण रस्ता (Kalyan Road) आदी उपनगरांतील पाणीपुरवठ्यात विस्कळीतपणा आला आहे.

पाणी पुरवठा
मंत्री विखेंचा जिल्हा नामांतराला विरोध

परिणामी आज बुधवारी रोटेशननुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागास कोठला, मंगलगेट, झेडींगेट, दाळमंडई, रामचंद्रखुंट, काळुबागवान गल्ली, धर्ती चौक, माळीवाडा, कोठी, कलेक्टर कचेरी परिसर या भागासह गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, टिव्ही सेंटर हडको, लाईट बिशप कॉलनी इ. परिसरात पाणी पुरवठा (Water Supply) करता आलेली नाही, या भागातील पाणीपुरवठा (Water Supply) उद्या (गुरुवारी) करण्यात येईल.

पाणी पुरवठा
नववर्षाच्या स्वागतानिमित्त साईचरणी 'एवढ्या' कोटींचे दान

गुरूवारी शहराच्या मध्यवर्ती भागासह सिद्धार्थनगर, सर्जेपुरा, तोफखाना, लालटाकी, दिल्लीगेट, नालेगांव, चितळे रोड, खिस्त गल्ली, आनंदीबाजार, कापडबाजार माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी परिसर इ. भागाचा पाणी पुरवठा (Water Supply) बंद राहणार असून या भागास शुक्रवारी पाणीपुरवठा होईल.

पाणी पुरवठा
ठाणे- अहमदनगर जिल्हे जवळ येणार

महावितरण कर्मचार्‍यांच्या संपामुळे (MSEDCL Strike Employees) पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. ही संभाव्य स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

पाणी पुरवठा
जिल्हा नामांतरावरून खा. विखेंचा सरकारला इशारा म्हणाले...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com