महापौर बाबासाहेब वाकळे
महापौर बाबासाहेब वाकळे
सार्वमत

नगर शहरात प्रभागनिहाय औषध फवारणीला सुरूवात - महापौर वाकळे

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरांमध्ये करोना रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे. त्यासाठी उपायोजना म्हणून संपूर्ण शहरांमध्ये 40 लोकांच्या टीम मार्फत औषध फवारणीचे काम महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या आदेशाने रविवारपासून सुरू करण्यात आले. यावेळी मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर, एस.आय. सुरेश वाघ, अविनाश हंस, मुकादम रंगनाथ भालेराव तसेच महापालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर वाकळे म्हणाले, शहरांमध्ये करोना रुग्णांची वाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला. संंपूर्ण शहरांमध्ये औषध फवारणी लवकरात लवकर करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेच्यावतीने 40 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आले असून त्यांच्या मार्फत रोज एक प्रभाग अशा पद्धतीने संपूर्ण शहरात फवारणी करण्यात येणार आहे.

प्रत्येक प्रभागातील नेमणूकीस असलेले एस.आय तसेच केअरटेकर यांच्यावर या प्रभागामध्ये फवारणी करण्याची जबाबदारी देण्यात आलेली असून आरोग्य अधिकारी डॉक्टर पैठणकर व मुख्य स्वच्छता निरीक्षक राजकुमार सारसर यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम काम करत असल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

29 जुलैच्या महासभेत उपमहापौर मालन ढोणे, स्थायी समिती सभापती मुदसर शेख, सभाग्रह नेते स्वप्नील शिंदे, सभापती लता शेळके, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, भाजप शहराध्यक्ष महेंद्र गंधे, सर्व नगरसेवक यांनी मागणी केली होती. त्या मागणीनुसार निर्णय घेण्यात आल्याचे महापौर वाकळे यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com