गुरूवारी पहाटे धो धो पावसाने धुतले; नगरमध्ये सीनेला पूर

गुरूवारी पहाटे धो धो पावसाने धुतले; नगरमध्ये सीनेला पूर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

परतीच्या पावसाने गुरूवारी पहाटे चारपासून नगर शहर आणि परिसरात धो धो धुतले. यामुळे सीना नदीला पूर येऊन कल्याण रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती. तिकडे जेऊर, डोेंगरगण आणि पिंपळगाव परिसरात अतिवृष्टी झाल्याने वांबोरी रस्त्यावरील वाहतूक पिंपळगावच्या सांडवीवर बंद झाली होती. परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यात हाहाकार माजवला असून राहाता तालुक्यात शिर्डीसह अनेक गावातील वाहतूक पावसामुळे बंद होती.

दरम्यान जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद राहुरीच्या ब्राम्हणी आणि नेवासा तालुक्यातील सोईन महसूल मंडलात झाली असून याठिकाणी प्रत्येकी 94 मि.मी, तर कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव मंडलात 92 मि.मी, सुरेगाव आणि रवांदे मंडलात 91 मि.मी, वांबोरी 86.3 मि.मी, नगरच्या नागापूर मंडलात 86 मि.मी, आणि राहाता मंडलात 70 मि.मी,सात्रळ 69.8 पावसाची नोंद झाली आहे. गुरूवारी पहाटे चारच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली.

ढगांच्या गडगडाटांसह विजेच्या कडकडाटांसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. सकाळी सात वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. नगर तालुक्यातील नागापूर मंडलात 53 मिली मीटर तर जेऊर महसूल मंडलात 86 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे सीना नदीला पूर आला होता. पावसाचे पाणी सीना नदी पात्रातून बाहेर आल्याने कल्याण रस्त्यावरील वाहतूक सकाळी बंद होती. त्याच दुपारी पुन्हा पावसाच्या मध्यम सरी कोसळ्या या पावसामुळे खरीप हंगामातील काढणीस आलेल्या सोयाबीन, बाजारी, कपाशी या पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

सीना नदीला पूर आल्याने नागरिकांनी पुराची पहाणी करण्यासाठी गर्दी केली होती. अशी परिस्थिती पिंपळगावच्या तलावाच्या सांडीवर झाली होती. याठिकाणी संरक्षक दगडावरून पाहणी वाहत असल्याने एसटीने पिंपळगाव गावातून बायपासमार्गे नगरला जाण्याचा मार्ग निवडला होता. सध्या सततच्या पावसामुळे सर्वत्र पाणीपाणी झाले असून शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदाची दिवाळी पावसात जाण्याची शक्यता असल्याने व्यापारी, विविध साहित्य विक्रेते धास्तावले आहेत.

असा आहे जिल्ह्यातील पाऊस

भिंगार 53.5, नागापूर 86, देवदैठण 22, सोनई 94, सात्रळ 69.8, ताहराबाद 40.8, ब्राम्हणी 94, वांबोरी 86.3, तळेगाव 25, समनापूर 39.3, घारगाव, डोळसणे प्रत्येकी 21, साकूर 66, वीरगाव 50, समशेरपूर 50, कोतूळ 21, ब्राम्हणवाडा 27.4, कोपरगाव 92, रवंदे 91.5, सुरेगाव 91.5, दहिगाव 65.3, राहाता 70, शिर्डी 32, लोणी 69.8, बाभळेश्वर 52, पुणतांबा 32.5 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com