अहमदनगरमध्ये खासगी क्लासेसकडून कोविड नियमांचे उल्लंघन

मनपाच्या दक्षता पथकाकडून दंडात्मक कारवाई
अहमदनगरमध्ये खासगी क्लासेसकडून कोविड नियमांचे उल्लंघन

अहमदनगर|Ahmedagar

शहरातील खासगी क्लासेसच्या (Private Classes) ठिकाणी कोविड नियमांचे पालन (Adherence to Covid Rules) केले जात नसल्याचा प्रकार महापालिकेच्या (Municipal Corporation) करोना दक्षता पथकाने (Corona Dakshata Squad) उघडकीस आणला. या पथकाने सोमवारी बालिकाश्रम रोडवरील (Balikashram Road) ज्ञानप्रबोधिनी लक्ष अ‍ॅकॅडमीविरोधात दंडात्मक कारवाई (Action) केली. विद्यार्थी आणि शिक्षकांकडून सुमारे आठ हजार रूपयांचा दंड वसूल (Fine Recovered) केला.

शहरासह जिल्ह्यात करोना रूग्णसंख्येत (Covid 19 Patient) लक्षणीय वाढ होत आहे. अहमदनगर शहरात (Ahmednagar City) सोमवारी 359 रूग्णांना करोना संसर्गाचे (Corona Contagion) निदान झाले. गेल्या 10 दिवसांपासून अहमदनगर शहरात करोनाबाधितांमध्ये वाढ (Covid 19 Positive Increse) होत आहे. त्यामुळे महापालिकेने करोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात करोना दक्षता पथकाकडून कारवाईस सुरूवात केली आहे.

या पथकाने सोमवारी बालिकाश्रम रोड येथील ज्ञानप्रबोधिनी लक्ष अ‍ॅकॅडमी येथे भेट दिली. तिथे काही विद्यार्थी व शिक्षक हे विनामास्क आढळले. त्यामुळे तेथे 16 विद्यार्थी व शिक्षक यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. कारवाईत सुमारे आठ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. नंदकुमार नेमाने, राजेंद्र बोरुडे, राहुल साबळे, अमोल लहारे, भीमराज कांगुडे ,नंदकुमार रोहोकले, गणेश वरूटे, विष्णू देशमुख, अमित मिसाळ, दीपक सोनवणे, गणेश धाडगे, अनिल कोकणी हे पथकात सहभागी होते.

Related Stories

No stories found.