नगर शहरातील उड्डाणपुलाचे साहित्य चोरीला

नगर शहरातील उड्डाणपुलाचे साहित्य चोरीला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरामध्ये उड्डाणपुलाचे काम (Flyover work) सुरू झाले असून या ठिकाणी असणारे 25 हजार रूपये किंमतीचे लोखंडी प्लेट चोरीला (thieves) गेल्या आहेत. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्रदीप विकास बोरवा यांनी फिर्याद दिली आहे. छावणी परिषद जवळ ही घटना घडली. उड्डाणपुलासाठी लागणारे साहित्य (Materials for flyovers) हे आजूबाजूच्या परिसरामध्ये ठेवण्यात आले होते. तेथून 32 हून अधिक प्लेट या रात्रीच्या सुमाराला चोरीला (Stolen) गेल्या आहेत. सदरची बाब बोरवा यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक साठे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com