नगर शहराच्या उड्डाणपुलाचे होणार सुशोभिकरण

खा. डॉ. विखे, आ. जगताप यांचा पुढाकार
नगर शहराच्या उड्डाणपुलाचे होणार सुशोभिकरण
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरात होत असलेल्या उड्डाणपुलाच्या (Flyover) कॉलमवर दोन्ही बाजूंनी शिवचरित्र (Shivcharitra) रेखाटण्यात येणार आहेत. याशिवाय मल्टिकलर सिस्टीम (Multicolor system), अ‍ॅम्फी थिएटर (Amphi theater), तीन चौकांत आकर्षक झाडे (Attractive Trees), पुलाखाली बगीचा (Garden under the Bridge), अशा वैविध्याने नगर शहराचे वैभव ठरणारा उड्डाणपूल (Flyover) नटणार आहे. एप्रिलमध्ये हे काम सुरू होईल. दिवाळीलाच उद्घाटन करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या वर्षभरात नगर शहराचे रुपडे बदलणार आहे. कोणत्याही परिस्थितीत वर्षअखेरीस नगर शहर पर्यटकीय केंद्र होईल. याचे उद्घाटनही अत्यंत आकर्षक पद्धतीने सांस्कृतिक महोत्सव भरवून केले जाईल, असे खासदार डॉ. सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe Patil) व आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी सांगितले.

नगर शहराच्या वैभवात भर घालणार्‍या उड्डाणपुलाचे काम प्रगतिपथावर आहे. उड्डाणपुलाला पर्यटकीय रूप देण्याचा मानस खा. डॉ. विखे व आ. जगताप यांचा आहे. यासंदर्भात त्यांनी पत्र परिषदेत माहिती दिली. उड्डाणपुलाच्या कॉलमवर दोन्ही बाजूंनी शिवचरित्र रेखाटण्यात येणार आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते राज्याभिषेक, तसेच जीवनातील महत्त्वाचे प्रसंग असतील. पुढील पिढीला ही चित्रे प्रेरणादायी ठरतील. पुलाखाली अत्यंत आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे नियोजन आहे. प्रजासत्ताकदिन, स्वातंत्र्यदिन, थोरांच्या जयंती, राष्ट्रीय सण, महत्त्वाचे सण या दिवशी वेगवेगळे रंग आपोआप बदलणार आहेत.

पुलाखालील सक्कर चौक, मार्केट यार्ड चौक, चांदणी चौक या तीन चौकांत खास सुशोभीकरण होईल. तेथे शोभेची कृत्रिम भव्य झाडे उभारली जातील. आतील बाजूने अवकाश तयार करण्यात येईल. त्यात चांदण्या चमकतील. या झाडांवर विशेष रोषणाई केली जाईल. खाली सुंदर बगीचा असेल. कॉलमवर महत्त्वाची चित्रे असतील. त्यामुळे हे तीनही चौक पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरणार आहेत. न भूतो न भविष्यति असा उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. त्या दिवशी सांस्कृतिक महोत्सव भरविण्यात येईल. यापूर्वी कधीच झाला नाही व भविष्यातही होण्याची शक्यता नाही, असा कार्यक्रम करण्याचा मनोदय खासदार व आमदारांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.