शहर बँक बोगस कर्जप्रकरण: मालपाणीला तिसर्‍या गुन्हात पोलीस कोठडी

आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू
शहर बँक बोगस कर्जप्रकरण: मालपाणीला तिसर्‍या गुन्हात पोलीस कोठडी

अहमदनगर | Ahmedagar

शहर बँकेच्या बोगस कर्जप्रकरणातील तिसर्‍या गुन्ह्यात योगेश मालपाणीला आज अटक झाली.

आर्थिक गुन्हे शाखेकडून पाहिल्या नंतर दुसर्‍या आणि आज त्याला तिसरा गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेण्यात आले. न्यायालयाने त्याला 25 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

योगेश मालपाणीला 16 जूनला जिल्हा पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. पहिल्या आणि दुसर्‍या गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी झाल्यानंतर आज तिसर्‍या गुन्ह्यात योगेश मालपाणीला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. शहर सहकारी बँकेच्या बोगस कर्जप्रकरणी गुन्ह्याचा तपास अद्याप सुरूच आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com