अहमदनगर : चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर : चाईल्ड पोर्नोग्राफीप्रकरणी गुन्हा दाखल

अहमदनगर (प्रतिनिधी) / ahmednagar - सोशल मीडियावर लहान मुलांचे अश्‍लील फोटो, व्हिडीओ अपलोड करून व्हायरल केल्याप्रकरणी येथील सायबर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई सांगळे यांनी फिर्याद दिली आहे. 18 मे 2020 रोजी सदरचा गुन्हा घडला आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयाकडून प्राप्त टिपलाईनवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने इंस्टाग्रामवर लहान मुलांचे अश्‍लील फोटो, व्हिडीओ अपलोड केले.

यावरून सायबर टिपलाईन अहवालमधील सत्यजित शेळके असे नाव असलेल्या संशयिताविरूद्ध सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल गुन्ह्यावरून आरोपीचा शोध घेतला जाईल व त्याला अटक केली जाईल, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक कोळी यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com