उड्डाणपुलाच्या उद्धाटनामुळे वाहतुकीत बदल

हॉटेल अशोका चौक ते सक्कर चौकादरम्यानची वाहतुक पर्यायी मार्गाने वळविली
संग्रहित
संग्रहित

अहमदनगर (प्रतिनिधी)

आज (शनिवार) उड्डाणपुलाचे उद्घाटन होणार आहे. यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत. हॉटेल अशोका चौक ते सक्कर चौकादरम्यानची सर्व प्रकारची वाहतूक व पादचारी यांना एक दिवस (24 तास) पर्यायी मार्गाने वळविली आहे.

पुणेकडुन औरंगाबादकडे जाणारे वाहतुकीकरीता केडगाव बायपास-कल्याण बायपास-विळद बायपास-शेंडी बायपास असा मार्ग असेल.नगर रेल्वे स्टेशनकडून पुणे औरंगाबादकडे जाणारे वाहतुकीकरीता व्हि.आर.डी.(कायनेटीक)चौक-केडगाव बायपास मार्ग तसेस व्हि.आर.डी.(कायनेटीक)चौक-केडगाव बायपास-कल्याण बायपास- नेप्ती नाका-दिल्ली गेट-अप्पू हत्ती चौक- पत्रकार चौक- एसपीओ चौक मार्गे असेल.

औरंगाबाद कडुन पुणेकडे जाणारे वाहतुकीकरीता मार्ग शेंडी बायपास-विळद बायपास-कल्याण बायपास-केडगाव बायपास मार्ग असेल. औरंगाबाद कडुन पाथर्डीकडे जाण्याकरीता एसपीओ चौक-न्यायनगर मार्गे वेलेश्वर चौक किल्ला-चौक मार्ग औरंगाबाद, मनमाडकडुन जामखेड, सोलापुरकडे जाणारे वाहतुकीकरीत शेंडी बायपास-विळद बायपास-कल्याण बायपास-केडगाव बायपास-अरणगाव बायपास वाळुंज बायपास मार्ग असेल. शिल्पा गार्डन ते हॉटेल अशोका चौक दरम्यान उड्डाणपुलावर तसेच खालील रस्त्यावर सर्व वाहने व पादचारी यांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com