दिवाळीपूर्वी प्रलंबित देयके द्या, अन्यथा विकासकामे थांबवू

बिल्डर्स असोसिएशनचा राज्यव्यापी आंदोलनात इशारा
दिवाळीपूर्वी प्रलंबित देयके द्या, अन्यथा विकासकामे थांबवू

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmedagar

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभाग (Public Works Department) व ग्रामविकास विभागाच्या (Rural Development Department) मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (Mukhyamantri Gram Sadak Yojana) या खात्यांकडे राज्यातील कंत्राटदारांची हजारो कोटींची बिले प्रलंबित आहेत. याच्या निषेधार्थ बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्यावतीने (Builders Association of India) राज्यव्यापी आंदोलन (Agigation) करण्यात आले.

सर्व जिल्ह्यांतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) कार्यकारी अभियंताच्या कार्यालयावर शुक्रवारी धरणे आंदोलन (Dharane Andolan) केले. नगरमध्येही (Ahmednagar) अधीक्षक अभियंता कार्यालयावर धरणे आंदोलन करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. डी. पवार व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अभियंता एच. एन. सानप यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी असोसिएशनचे कंत्राटदार समिती चेअरमन महेश गुंदेचा, जिल्हाध्यक्ष अनिल कोठारी, सेक्रेटरी उदय मुंढे, संजय गुंदेचा, दिगंबर जगताप, आदिनाथ घुले, राजेंद्र जाधव, संजय डोके, अनिल सोनावणे आदींसह संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

महेश गुंदेचा म्हणाले, नगर जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ६९५ कोटी तर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेकडे १२५ कोटी रुपयांची देयके प्रलंबित आहेत. त्यामुळे ठेकेदारांचे बँकेच्या कर्जाची हफ्ते, व्याज, कामगारांचे पगार, मजुरांचे पगार, मशिनरीची इंधन बिले, पुरवठादारांचे देणे थकल्यामुळे खूप मोठ्या अडचणीत निर्माण झाल्या आहेत. जर येत्या दिवाळीपूर्वी सर्व ठेकेदारांची प्रलंबित देयके मिळाली नाहीत तर बिल्डर असोसिएशन कठोर निर्णय घेऊन संपूर्ण राज्यातील सर्व विकासकामे आहे त्या स्थितीत थांबवू, असा इशारा त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.