'त्या' मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

तोफखान्यात खूनाचा गुन्हा दाखल
'त्या' मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

अहमदनगर | Ahmednagar

मासे पकडण्यासाठी बीड जिल्ह्यातील दौला वडगाव (ता. आष्टी) येथे गेलेल्या नगरमधील एकाचा मृत्यू झाल्याची घटना काल घडली.

कचरू दत्तू कांबळे (वय 45 रा. रामवाडी, नगर) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी मृत कचरू कांबळे यांचा मुलगा आकाश कांबळे याने काल रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कचरू कांबळे यांना मासेमारी करण्यासाठी घेऊन जाणारे योगेश आरुणे व युनुस शेख (दोघे रा. रामवाडी) यांच्या विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्या दोघांना अटक केली आहे.

आज त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके या गुन्ह्याचा तपास करत आहेत. दरम्यान कचरू कांबळे यांना योगेश व युनुस यांनी अज्ञात कारणातून मारहाण केल्याने त्यांच्या मृत्यू झाला असल्याचे आकाश याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com