बोल्हेगावमध्ये कंटेन्मेंट झोन जाहिर

बोल्हेगावमध्ये कंटेन्मेंट झोन जाहिर
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना रूग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे बोल्हेगाव परिसरात महापालिकेने कटेन्मेंट झोन जाहीर केला आहे.

गांधीनगर रोडवर भराडी सोसायटीमध्ये पश्चिमेस शिंदे यांचे घर, उत्तरेस ओपन स्पेस समोरील कॉलनी, पूर्वेस ओपन स्पेस समोरील घरे, दक्षिणेस जाधव यांचे घर ते गायकवाड यांचे घर ते शिंदे घर या भागात येत्या 5 मे पर्यंत निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या परिसरातील वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापने, दुकाने बंद करण्यात आली आहेत. या भागातील वाहतूकीलाही निर्बंध घालण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com