खा. सुजय विखे पाटलांना करोनाची लागण; ट्विट करुन म्हणाले...

खा. डॉ. सुजय विखे
खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर | Ahmednagar

अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना करोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

'आज माझी कोव्हीड टेस्ट पॉझीटीव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही. परंतु, खबरदारी म्हणून मी स्वतः विलागीकरणात जात आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोव्हीड टेस्ट करावी व काळजी घ्यावी,' असं आवाहन सुजय विखे पाटलांनी केलं आहे.

दरम्यान गेल्या ३० डिसेंबरला राधाकृष्ण विखे पाटील यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह (Radhakrishna Vikhe Patil Corona Positive) आली. त्यानंतर आता त्यांचे सुपूत्र आणि खासदार सुजय विखे पाटील यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com