शेतकर्‍यांना मिळणार 2 कोटी 94 लाखांची सवलत

भूविकास बँकेची 31 मार्च 2021 पर्यंत ओटीएस सवलत योजना
Indian rupee
Indian rupee

अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्हा भू विकास बँकेच्या एकरकमी कर्ज परतफेड योजनेसाठी 315 सभासद पात्र आहेत. त्यांच्याकडे प्रचलित नियमानूसार 6 कोटी 16 लाख रुपयांची

थकबाकी आहे. राज्य सरकारने बँकेच्या थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी एकरक्कमी कर्जफेड (ओटीएस) आणली आहे. या योजनेत शेतकर्‍यांना 3 कोटी 22 लाख रुपयांचे कर्ज भरावे लागणार असून 2 कोटी 94 लाख रुपयांची भरघोस सवलत मिळणार आहे.

जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँक मर्यादित (भूविकास बँक) च्या एकरक्कमी कर्जपरतफेड योजनेला (ओटीएस) राज्य सरकारचे वतीने 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढण्यात देण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यास इच्छुक असणार्‍या शेतकर्‍यांनी त्यांच्याकडील थकबाकी भरावी आणि 7/12 उतारा कोरा करून घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी केले आहे.

राज्य सरकारने 20 ऑक्टोबरला भूविकास बँकेच्या कर्जदार थकबाकीदारांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याचा धोरणात्मक निर्णय जाहीर केलेला आहे. दिर्घ कालावधीपासून थकोत कर्ज विचारात घेता एकरकमी कर्ज परतफेड योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी सभासदांना लाभ घेता यावा, यासाठी या योजनेला 31 मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

ही एकरकमी कर्ज परतफेड योजना ही थकबाकीदार शेतकर्‍यांसाठी शेवटची संधी म्हणून सरकार राबवित आहे. या एकरकमी कर्ज परतफेड योजनेसाठी जिल्ह्यात 315 सभासद पात्र असून प्रचलित हिशोब त्यांच्याकडे 6 कोटी 16 लाख रुपयांची थकबाकी आहे. या योजनेत शेतकर्‍यांना 3 कोटी 22 लाख रुपयांचे कर्ज भरावे लागणार असून उर्वरित रक्कम माफ होणार आहे. या योजनेते शेतकरी सभासदांना 2 कोटी 94 लाख रुपयांची भरघोस सवलत मिळणार आहे. यामुळे शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक आहेर यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com