आणखी २ कोटी वर्ग; भुईकोट किल्ला सुशोभीकरणाला येणार वेग

आणखी २ कोटी वर्ग; भुईकोट किल्ला सुशोभीकरणाला येणार वेग

अहमदनगर (प्रतिनिधी)

ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी यासाठी राज्य शासनाने ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पहिला टप्प्यात सुमारे ९० लाख रुपयांचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग झाला होता.

आता २ कोटी रूपयांचा दुसरा हप्ता वर्ग झाला आहे. सरकारकडून मिळालेल्या या निधीमुळे किल्ला सुशोभीकरणाला वेग येईल, असा विश्वास आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केला आहे.

भुईकोट किल्ला सुशोभीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुमारे २ कोटी ९० लाख रुपयांचा निधी आतापर्यंत प्राप्त झाला आहे. भुईकोट किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी या निधीचा उपयोग होणार आहे. याच बरोबर पर्यटनास देखील चालना मिळणार आहे.

ऐतिहासिक वारसा लाभलेल्या भुईकोट किल्ल्याचा विकास व्हावा हाच मानस डोळ्यासमोर ठेवून शासनाकडे पाठपुरावा केला. विकासासाठी टप्प्या टण्याने निधी प्राप्त होत असल्याची माहिती आ. जगताप यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com