<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) - केडगावातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य आरोपी सुवर्णा कोतकर यांना अटक करावी तसेच विशेष सरकारी वकिल म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करावी अशी मागणी संग्राम कोतकर यांच्यासह शिवसेना नगरसेवकांनी शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्याकडे केली.</strong></p>.<p>महापालिकेच्या पोटनिवडणुकीत केडगावात एप्रिल 2018 मध्ये दोघा शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या हत्या प्रकरणात माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर, औंदुबर कोतकर हे आरोपी आहेत. मात्र अद्यापही त्यांना अटक झालेली नाही. दोन वर्षे उलटून गेले तरी अजून केस प्रोसेडिंग नाही. सुवर्णा कोतकर यांनी कोर्टातून मिळविलेला जामीन फिर्यादीने रद्द करून आणला. तरीही पोलीस त्यांना अटक करत नाही, अशी तक्रार खा. राऊत यांच्याकडे करण्यात आली. त्यावर राऊत यांनी पक्षीय पातळीवरून संबंधित यंत्रणेला आदेश दिले जातील. सहा महिन्यात कोणतीच कार्यवाही झाली नाहीतर स्वत: नगरमध्ये येवून तळ ठोकून बसू असे सांगत शिवसैनिकांची हत्या करणार्यांना आरोपींना धडा शिकविला जाईल असे आश्वासन दिले.</p>