उड्डाणपूल रस्त्यावरील निचरा व्यवस्था करा

तुंबणाऱ्या पाण्यावर आमदारांची सूचना
उड्डाणपूल रस्त्यावरील निचरा व्यवस्था करा

अहमदनगर (प्रतिनिधी)

उड्डाणपुलालगतच्या सक्कर चौक, अक्षता गार्डन, कोठी चौक व सीएसआरडी कॉलेज रस्त्यांवर पावसाळ्यामध्ये पाणी तुंबणार नाही, यासाठी आतापासून कार्यवाही करावी, अशी सूचना आ. संग्राम जगताप यांनी बैठकीत केली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजनेचा आराखडा तयार करण्याचीविषयी चर्चा बैठकीत झाली.

उड्डाणपूल रस्त्यावरील निचरा व्यवस्था करा
बघा नजरेतून वाचता आलं तर...! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

उड्डाणपूल रोडवरील साईड गटार दुरुस्तीबाबत आ. संग्राम जगताप यांनी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार पाहणी करून बैठकीचे आयोजन गुरूवारी मनपा कार्यालयात करण्यात आले होते. सक्कर चौक, अक्षता गार्डन, कोठी चौक व सीएसआरडी कॉलेज रस्त्यांवर पावसाळ्यामध्ये तीन ते चार फुटांपर्यंत पावसाचे पाणी साचते. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होतो. याचबरोबर परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण होतो. तरी तात्पुरत्या स्वरूपात या चार ते पाच ठिकाणचे पाणी निचरा होण्यासाठी योग्य उपाययोजना करावी. तसेच हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यासाठी मनपा व राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाने प्लॅन तयार करावा, अशा सूचना यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी प्रशासनाला दिल्या.

उड्डाणपूल रस्त्यावरील निचरा व्यवस्था करा
राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

आता तात्पुरत्या स्वरूपात सदर रस्त्यावर पाणी साचणार नाही यासाठी उपाययोजना करून तातडीने काम सुरू करावे असे आदेश संबंधित यंत्रणेला देण्यात आले. मनपा आयुक्त शंकर गोरे व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी दिवाण यांनी यावेळी चर्चा केली. स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, उपायुक्त यशवंत डांगे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, शहर अभियंता सुरेश इथापे, उद्योजक अफजल शेख, जलअभियंता परिमल निकम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

एका बाजूने टँकर ओता, मग...

नगरउत्थान योजनेतील बालिकाश्रम रोड, मुकुंदनगर, सक्कर चौक ते कोठी रस्ता, महात्मा फुले चौक परिसरातील रस्त्यावरील साईड गटारी स्वच्छ करण्याचे काम तातडीने सुरू करावे. एका बाजूने टँकरद्वारे पाणी टाकावे तर दुसऱ्या बाजूला पाणी निघाल्यानंतरच ठेकेदाराचे बिल अदा करावे. अशीच तपासणी संपूर्ण शहरभर करावी, अशी सूचना आमदार संग्राम जगताप यांनी बैठकीत केली.

उड्डाणपूल रस्त्यावरील निचरा व्यवस्था करा
अजब लग्नाची गजब गोष्ट! चक्क वयाच्या ६६ व्या वर्षी भारताचे माजी क्रिकेटपटू चढले बोहल्यावर

Related Stories

No stories found.