जनावरांसाठी 'वाघ्या' धावले मनपाकडे

लिलाव तातडीने रद्द करण्याची मागणी
जनावरांसाठी 'वाघ्या' धावले मनपाकडे

अहमदनगर (प्रतिनिधी)

दोन दिवसांपूर्वी जनावरांच्या लिलावाबाबत मनपाने जाहीर केले. या जनावरांच्या लिलावासाठी वाघ्या फाऊंडेशनने विरोध केला आहे. शहरातील मोकाट जनावरे गाय, बैल, म्हैस पिंपळगाव माळवी या जागेत ठेवली आहेत. याचा मनपाला काही त्रास नाही. त्यांचा सांभाळ करण्यासाठी कोणत्याही गडगंज निधीची गरज नसताना मनपा जनावर सांभाळू शकत नाही, हे खेदजनक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

जनावरांसाठी 'वाघ्या' धावले मनपाकडे
Sanskruti Balgude : संस्कृती बालगुडेच्या मनमोहक सौंदर्याची नेटकऱ्यांना भुरळ

२०/२५ जनावरांच्या पैश्यातून काय मिळवणार आहात?, असा सवाल वाघ्या फाऊंडेशनने केला आहे. या लिलावाच्या जाहिरातीपेक्षा कोणी या जनावरांचा सांभाळ करणारी संस्था असेल तर संपर्क साधा या आशयाची जाहिरात केली असती तर आम्हाला अभिमान वाटला असता. या प्रकारे मनपाने मोकाट जनावरांचा लिलाव करणं चुकीचे आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६/टी५ बी या तरतुदीनुसार कोणतीही संस्था किंवा व्यक्ती कोणत्याही प्राण्यांची खरेदी अथवा विक्रीसाठी ऑफर (लिलाव) देऊ शकत नाही हा लिलाव बेकायदेशीर आहे. या लिलावातील जनावरे खुलेआमपणे खटकाला जाणार आणि या गाई, बैलांची कत्तल होणार हे जगजाहीर आहे.

जनावरांसाठी 'वाघ्या' धावले मनपाकडे
PHOTO : मुकेश अंबानींकडून अलिशान हॉटेलची खरेदी; तब्बल ७३५ कोटींची गुंतवणूक

महानगरपालिकेची ७०० एकर जागा पिंपळगाव माळवी या ठिकाणी आहे. जर महानगरपालिकेने ३/४ एकर मध्ये गोशाळा उभारली तर भारतातील पहिली गोशाळा नगर मनपाची असेल शिवाय मनपाला यातून उत्पन्नदेखील तयार होऊ शकतो. पण यासाठी योग्य मानसिकता असणं गरजेचे आहे. माझी आपणास नम्र विनंती आहे. या लिलावावर योग्य तोडगा निघेपर्यंत हा लिलाव रद्द करण्यात यावा. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा लिलाव होऊ देणार नाही.

जनावरांसाठी 'वाघ्या' धावले मनपाकडे
Katrina and Vicky : विकी-कतरिनाच्या हळदीचे फोटो पाहिलेत का?

२ दिवसात आपण मला या बाबत लेखी खुलासा न केल्यास हा लिलाव रद्द न केल्यास ज्या ठिकाणी लिलाव होणार त्या ठिकाणी मी आत्मदहन करणार आहे याची आपण दखल घ्यावी माझा जीव गेला तरी या प्रकारे कोणताही लिलाव होऊन मुक्या जनावांची कत्तल होऊ देणार नाही असा इशारा निवेदनाद्वारे अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांना वाघ्या फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे. यावेळी समवेत अमोल कनगरे, स्वप्निल वाघ, संकेत जरे, ललित भूमकर, राधिका रणभोर सागर ठोके आदी यावेळी उपस्थित होते.

जनावरांसाठी 'वाघ्या' धावले मनपाकडे
Irrfan Khan Birth Anniversary : आठवणीतला इरफान खान…

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com