मर्चन्ट बँकेच्या अध्यक्षपदी आनंदराम मुनोत बिनविरोध

मर्चन्ट बँकेच्या अध्यक्षपदी आनंदराम मुनोत बिनविरोध

अहमदनगर l प्रतिनिधी

अहमदनगर मर्चन्टस को-ऑप. बँकेच्या (Ahmednagar Merchants Co-op Bank) चेअरमनपदी आनंदराम मुनोत (Anandram Munot) यांची बिनविरोध निवड झाली. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या अध्यक्षतेखाली व विक्रम मुटकुळे यांच्या उपस्थित बँकेच्या संचालक मंडळाच्या आज झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. किशोर गांधी यांनी चेअरमनपदासाठी मुनोत यांचे नाव सूचवले. त्यास संचालक सीए आयपी अजय मुथा यांनी अनुमोदन दिले.

याप्रसंगी व्हाईस चेअरमन सुभाष बायड, संचालक हस्तीमल मुनोत, किशोर गांधी, अनिलकुमार पोखरणा, आदेश चंगेडिया, संजयकुमार बोरा, सीए मोहन बरमेचा, कमलेश भंडारी, संजयकुमार चोपडा, अमित मुथा, संजीवजी गांधी, संचालिका श्रीमती मीना मुनोत, श्रीमती प्रमिलाबाई बोरा, विजयराव कोथिंबीरे, सुभाषराव भांड, कर्मचारी प्रतिनिधी संदिप लोढा, अनंत होशिंग, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन भंडारी आदी उपस्थित होते.

दिग्विजय आहेर यांचा सत्कार संस्थापक चेअरमन व विद्यमान संचालक हस्तीलम मुनोत यांनी केला. तर नुतन चेअरमन आनंदराम मुनोत यांचा सत्कार माजी चेअरमन अनिल पोखरणा यांनी केला तसेच माजी चेअरमन अनिल पोखरणा यांचा सत्कार दिग्विजय आहेर यांनी केला आणि विक्रम मुटकुळे यांचा सत्कार व्हाईस चेअरमन सुभाष बायड यांनी केला.

संचालकांच्या सहकार्याने बँकेची नेत्रदिपक प्रगती करण्यासाठी यापुढील वाटचाल यशस्वी करणार आहोत. मी व्यापारी असल्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्याचा सतत प्रयत्न राहील.

आनंदराम मुनोत

चेअरमन आनंदराम मुनोत यांनी यापूर्वीही हे पद भुषविले आहे. त्यांना या क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. नवीन चेअरमन पदाच्या कालावधीत या अनुभवाचा निश्चीत उपयोग करुन बँकेला प्रगतीपथावर नेतील असा विश्वास आहे.

हस्तीमल मुनोत

Related Stories

No stories found.