दिवाळीपूर्वी मनपा पाडणार प्रकाश

स्मार्ट एलईडी प्रकल्प : स्थायी सभेत होणार चर्चा
दिवाळीपूर्वी मनपा पाडणार प्रकाश
मनपा

अहमदनगर | प्रतिनिधी

दिवाळीपूर्वी (Diwali) नगर शहरातील (Ahmednagar City) रस्त्यांवर स्मार्ट एलईडींचा (Smart LED) प्रकाश पडण्याचा संकल्प मनपाच्या स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी केला आहे. शुक्रवार, 3 सप्टेंबर रोजी स्थायी समितीच्या सभेत या विषयावर निर्णय होणार आहे.

नगर शहरात 35 ते 40 हजार पथदिवे आहेत. यापैकी 30 ते 40 टक्के पथदिवे बंद आहेत. त्यामुळे शहरामध्ये ठिकठिकाणी अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे मनपा पदाधिकारी व प्रशासनाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. मनपाच्या आर्थिक परिस्थिती अभावी वेळेवर विद्युत साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे पथदिवे दुरूस्त होत नाहीत. त्यामुळे अनेक दिवस परिसरात अंधाराचे साम्राज्य राहते.

मनपाला वर्षभरात विद्युत साहित्य देखभालीसाठी 80 लाख रूपये खर्च येतो. त्याचप्रमाणे विद्युत वाहन खर्चापोटी वर्षभरासाठी 30 लाख खर्च होतो. एकूण 1 कोटी 10 लाख खर्च येत आहे. स्मार्ट एलईडी पथदिव्याचा प्रकल्प राबविल्यावर मनपाची आर्थिक बचत होण्याची अपेक्षा आहे. सेवा देणार्‍या कंपनीकडून तातडीने पथदिव्यांचे प्रश्न मार्गी लावले जातील, असे घुले यांनी म्हटले आहे. स्मार्ट एलईडी प्रकल्पामुळे (Smart LED project) पथदिव्याचा (Streetlights) प्रश्न मार्गी लागणार आहे. या कामासाठी महापौर सौ.रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, आयुक्त शंकर गोरे, प्रकल्प अभियंता आर.जी.मेहेत्रे यांचे सहकार्य आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

सणासुदीचे दिवस सुरू होत असून दिवाळीपूर्वी शहर विद्युत पथदिव्यांनी उजळणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागताना मनस्वी आनंद होत आहे.

अविनाश घुले, मनपा स्थायी समिती सभापती

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com