महापौरपदाच्या निवडणुकीतून भाकरे यांची अचानक माघार

पक्षश्रेष्ठींना पत्राव्दारे कळविला निर्णय
महापौरपदाच्या निवडणुकीतून भाकरे यांची अचानक माघार

अहमदनगर (प्रतिनिधी)

नगरच्या महापौरपदाची निवडणूक जवळ येवून ठेपली असतांनाच शिवसेनेतील इच्छुक रिता भाकरे यांनी या पदाच्या निवडीतून माघार घेतली असल्याचे पक्षश्रेष्ठींना कळवले आहे.

शिवसेनेकडून महापौरपदासाठी रोहिणी शेंडगे व रिता भाकरे हे महापौरपदासाठी इच्छुक असल्याचे सांगण्यात येत होतं. त्यानुसार दोघांनीही वरिष्ठांकडे उमेदवारी मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला होता. मात्र, आता रिता भाकरे यांनी महापौरपदासाठी उत्सुक नसल्याचे जाहीर केले आहे.

महापौरपदाच्या निवडणुकीतून भाकरे यांची अचानक माघार
शरद पवारांच्या भेटीसाठी प्रशांत किशोर 'सिल्व्हर ओक'वर; कोणती रणनीती ठरणार?

याबाबत त्यांनी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. हे पत्र सोशल मिडियातही व्हायरल झाले आहे. उमेदवारीच्या स्पर्धेतून बिनशर्त माघार घेत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. भाकरे यांनी माघार घेतल्याने शेंडगे यांच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. भाकरे हे स्व.अनिल राठोड यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अचानक माघारीने पक्षात सध्या अनेक तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com