अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिकेतील सभागृह नेते पदाची पुन्हा एकदा खांदेपालट केली जाणार आहे. भाजपचे नगरसेवक रवींद्र बारस्कर यांना सभागृह नेता म्हणून नियुक्ती देण्यात आली असून तसे पत्र महापौर बाबासाहेब वाकळे आज दुपारी बारस्कर यांना दिले.

डिसेंबर 2018 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आली. बाबासाहेब वाकळे हे भाजपचे पहिले महापौर झाले. स्वप्नील शिंदे हे पहिले सभागृह नेते होते. त्यांच्यानंतर मागील वर्षी मनोज दुल्लम यांना सभागृह नेतेपदी नियुक्त करण्यात आले. आता भाजपने पुन्हा एकदा सभागृह नेते पदाची खांदेपालट करण्याचा निर्णय घेत रवींद्र बारस्कर यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पत्र आज सोमवारीच महापौरांकडून बारस्कर यांना देण्यात आले.

महापौरांच्या वार्डातच सभागृह नेता

रवींद्र बारस्कर आणि महापौर वाकळे हे एकाच वार्डातून निवडून आले आहेत. पोटनिवडणुकीतही भाजपने बाजी मारत पल्लवी जाधव यांच्या रुपाने भाजपचा वार्ड म्हणून सहा नंबरची ओळख निर्माण केली. या वार्डातील चारही नगरसेवक भाजपचे आहेत. आता याच वार्डाला सभागृह नेते पदाची संधी मिळाल्याने महापौर आणि नेता एकाच वार्डातील असणार आहेत.

संधी दिल्याबद्दल पक्षाचे आभार. पदाच्या माध्यमातून शहर विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवू. सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊ. - रविंद्र बारस्कर