अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

कोव्हिड संदर्भातील तक्रारी नोंदविण्यासाठी महापालिकेने तक्रार निवारण केंद्र स्थापन केले असून, तेथे दोन कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

करोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत. या संदर्भातील काही तक्रारी असल्यास तसेच चाचणी केली, रिपोर्ट मिळाला नाही, आपल्या परिसरात कोणी नवीन व्यक्ती आलेली असल्यास, संशयास्पद रूग्ण असल्यास या तक्रार निवारण केंद्रात तक्रार नोंदविता येणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.

यासाठी 0241- 2343622, 2340522 आणि टोल फ्री क्रमांक 14420 हे क्रमांक देण्यात आले आहेत. तसेच येथे सकाळी आठ ते रात्री आठ आणि रात्री आठ ते सकाळी आठ असे दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नितीन दिगंबर गोरे आणि राहुल रमेश खाबिया अशी या कर्मचार्यांची नावे आहेत.