पुण्याचे डांगे नगर महापालिकेत उपायुक्त

सहा महिन्यांपासून रिक्त होते पद
पुण्याचे डांगे नगर महापालिकेत उपायुक्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सहा महिन्यांपासून रिक्त असलेल्या महानगरपालिकेच्या उपायुक्तपदी यशवंत डांगे यांच्या नियुक्तीचे आदेश काल शासनाने काढले आहे.

पुणे महापालिकेत सहायक आयुक्त असलेले डांगे यांच्या नियुक्ती झाल्याबाबतचे पत्र महापालिकेला रात्री उशिरा मिळाली.

दरम्यान यापूर्वी डांगे हे कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी असताना त्यांनी कराड शहराला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत. मात्र त्याचसोबत नगरपरिषदेच्या ठराविक नगरसेवकांशी जमेची तर अनेकांशी त्यांचे मतभेद झाले होते. मुख्याधिकारी डांगे हे सप्टेंबर 2017 मध्ये कराडला मुख्याधिकारी म्हणून रूजू झाले. त्यानंतर डांगे यांनी 2018 आणि 2019 या दोन वर्षात कराड नगरपालिकेस स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चांगले यश मिळवून दिले होते.

2019 मध्ये कराड नगरपालिकेचा देश पातळीवर प्रथम क्रमांक आला. यासाठी सुमारे 20 कोटी रुपयांचे बक्षीस नगरपालिकेस मिळाले आहे. 2020 सालच्या स्पर्धेचा निकाल प्रलंबित असून यातही कराड नगरपालिका देशपातळीवर बाजी मारण्याची शक्यता आहे.

हे यश मिळवून देण्यात यशवंत डांगे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर डांगे यांची पुणे महापालिकेत सहायक आयुक्तपदावर बदली झाली होती. तेथून पुन्हा नगर मनपामध्ये उपायुक्तपदावर बदली झाली आहे.

आयुक्तांची प्रतीक्षा

आयुक्त श्रीकांत मायकलवार डिसेंबरमध्ये रिटायर झाले. त्यानंतर आयुक्तपदाचा पदभार कलेक्टरांकडे असून आता उपायुक्त आले आहेत. मात्र, आयुक्त कोण येणार याची उत्सुकता नगरकरांना आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com