शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य

मुख्य कार्यकारी अधिकारी क्षिरसागर यांची ग्वाही
शिक्षकांचे प्रश्‍न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar

शिक्षकांचे (Teachers) प्रश्‍न सोडविण्यास नेहमीच प्राधान्य देतो. अवघड क्षेत्रातील शाळांबाबत (School) अंतिम निर्णय झालेला नाही. सातपैकी तीन निकषात बसणार्‍या शाळा अवघड क्षेत्रात सामावून घेतल्या जातील, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (ZP CEO Rajendra Kshirsagar) यांनी केले.

शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर (Dr Sanjay Kalamkar) यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक समिती व गुरुकुलच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे (Shivaji Shinde) यांची भेट घेतली.

करोनाच्या (Corona) आघाडीवर शिक्षक डाटा एंट्री (Data entry) सारखी अनेक कामे करत आहेत. पण सेतू प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षकांना आवश्यक वेळ मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांना देण्यात येणारी डाटा एन्ट्रीसारखी कामे काढून घ्यावीत, वरिष्ठ वेतनश्रेणीचे पुर्ण जिल्ह्याची सुमारे 450 प्रकरणे तात्काळ मंजूर करावीत, वैद्यकिय बिले व भविष्य निर्वाह निधीसाठी निधी मंजूर करून सर्व प्रकरणांची पुर्तता करावी इत्यादी प्रश्‍नांवर साधकबाधक चर्चा झाली. निधीबाबत असमर्थता व्यक्त करुन इतर सर्व प्रलंबीत प्रश्‍न तात्काळ मार्गी लावण्याची ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर व शिक्षणाधिकारी शिंदे यांनी स्वतंत्रपणे दिली. समिती गुरुकुलच्या शिष्टमंडळात दत्ता जाधव (Datta Jadhav), मधूकर मैड (Madhukar Maid), विजय महामूनी (Vijay Mahamuni) व इतर प्रतिनिधी उपस्थित होते.

शालेय पोषण आहाराच्या 150 रुपये रक्कमेसाठी मुले व पालकांना 500े ते एक हजार रुपये खर्च येत असल्याची बाब डॉ. कळमकर यांनी लक्षात आणून दिली. यावर झिरो बॅलन्सने मुलांची खाती उघडा. झिरो बॅलन्सने खाते उघडण्यास नकार देणार्‍या बँकाची नावे तात्काळ आम्हाला कळवा असे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com