अहमदनगर (प्रतिनिधी) -

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यामुळे सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी तालुकानिहाय

आढावा घेत कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. करोनाचा फैलाव वाढण्यात गर्दी कारणीभूत ठरत असल्याने जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालयवर लक्ष ठेवण्यात येत आहे. हॉटेल चालकांनी 50 टक्के क्षमतेनेच ग्राहकांना प्रवेश द्यावा, अन्यथा हॉटेल बंद करण्याची कारवाई करावी लागेल असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिला आहे.

दरम्यान, सोमवारी जिल्ह्यातील करोनाच्या रूग्ण संख्येत 559 ने वाढ झाली आहे. यामुळे उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 546 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 298, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 241 आणि अँटीजेन चाचणीत 20 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 143, अकोले 16, जामखेड 22, कर्जत 3, कोपरगाव 37, नगर ग्रामीण 8,

नेवासा 5, पारनेर 9, पाथर्डी 3, राहाता 2, राहुरी 2, संगमनेर 18, शेवगाव 12, श्रीरामपूर 10, कॅन्टोन्मेंट 8 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 74, अकोले 11, जामखेड 2, कोपरगाव 13, नगर ग्रामीण 6, नेवासा 9, पारनेर 6, पाथर्डी 5, राहाता 34, राहुरी 12, संगमनेर 37, शेवगाव 9, श्रीगोंदा 5, श्रीरामपूर 13 आणि इतर जिल्हा 5 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत 20 जण बाधित आढळुन आले. मनपा 12, नेवासा 1, राहाता 3, श्रीरामपूर 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, वाढत्या करोना रुग्णांचा धसका जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. काल जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी जिल्ह्यातील तहसीलदार, आरोग्य यंत्रणेतील अधिकार्यांची बैठक घेऊन वाढत्या रुग्ण संख्येमुळे तालुका पातळीवरील कोविड केअर सेंटर सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गर्दीच्या ठिकाणे असणारे हॉटेल, भोजनालय, रेस्टॉरंट चालकांनी गर्दीवर नियंत्रण ठेवावे, अन्यथा ते बंद करण्याचा इशाराच दिला आहे.