नेहरू मार्केट आगीत खाक

नेहरू मार्केट आगीत खाक

अहमदनगर | Ahmedagar

भिंगार (Bhingar) शहरातील शुक्रवार बाजार तळावरील नेहरू मार्केटला (Nehri Market) आज पहाटे भीषण आग लागली. मार्केटमधील 24 पैकी 20 दुकाने जळून आगीत खाक झाली आहेत. (Ahmednagar fire news)

पहाटे साडेतीन वाजल्यानंतर ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे (Short circuit) आग लागल्याचे समजते. अग्निशमन दलाकडून (Fire brigade) आग विझविण्याचे काम सकाळपर्यंत सुरू होते. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली.

शुक्रवार बाजारमध्ये आग लागण्याची माहिती मिळताच नियंत्रण कक्ष मार्फत राहुरी, अहमदनगर, एमआयडीसी, व्हीआरडीई अशा अग्निशामक दलांना बोलावून घेण्यात आले. ग्रामसुरक्षा यंत्रणा मार्फत ग्रामस्थांना घरातून बाहेर निघण्यास संदेश देण्यात आला.

शहरातील पोलीस पेट्रोलिंग मोबाईल तसेच अधिकारी यांना घटनास्थळी बोलावून घेत आग मी विझविण्याची कार्यवाही करण्यात आली. उपअधीक्षक प्रांजल सोनवणे, शहरातील भिंगार, तोफखाना, कोतवाली, नगर तालुका पेट्रोलिंग मोबाईल, आरसीपी असे हजर होते. कुठलीही जीवित हानी झाली नाही.

आमदार संग्राम जगताप यांच्या बरोबर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अजी-माजी सदस्य, अधिकारी, कर्मचारी आल्याने त्यांच्या मदतीने होणारी जीवितहानी व वित्तहानी वाचवण्यात आल्याची माहिती भिंगारचे सहाय्यक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com