
अहमदनगर (प्रतिनिधी)
कौटुंबिक वादातून महिलेला मोबाईलवर अश्लिल शिवीगाळ केल्याबद्दल तरूणाविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतुल पडागळे (रा. आशियाना कॉलनी, भिस्तबाग नाका, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. सावेडीतील सोनानगर भागात ही घटना घडली असून तेथील रहिवाशी महिलेने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांना अतुल पडागळे याने गुरूवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एका महिलेला मोबाईलवर फोन केला. या महिलेशी अश्लिल भाषेत बोलला.
तसेच आयुष्य बरबाद करण्याची धमकी दिली. या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अतुल पडागळे याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.