७७ जवान देशसेवेसाठी सज्ज; रिंकल सिंग सर्वोत्तम

७७ जवान देशसेवेसाठी सज्ज; रिंकल सिंग सर्वोत्तम

अहमदनगर | प्रतिनिधी

मैकनाईज्ड इन्फंट्री सेंटर आणि स्कूल (Mechanized Infantry Center and School) येथे भारतीय सैन्याच्या (Indian Army) यांत्रिक पायदळ रेजिमेंटमध्ये ७७ प्रशिक्षणार्थी जवानांना मूलभूत आणि प्रगत लष्करी शिक्षण पूर्ण केल्यानंतर देशसेवेची शपथ देण्यात आली. रिंकल सिंग या बॅचचा सर्वोत्तम रिक्रुट ठरला. त्याला जनरल सुंदरजी सुवर्ण पदकाने सन्मानीत करण्यात आले.

यावेळी जवानांच्या परेडची सलामी मैकनाईज्ड इन्फैंट्री सेंटर चे कमांडंट ब्रिगेडियर रसेल डिसूजा यांनी घेतली. भारतीय सेनेच्या सर्वोच्च परंपरांचे पालन करून मेजर माने नीलेश संदीप यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज आणि मैकनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंट कलर्स यांच्या उपस्थितीत या जवानांना कर्तव्यनिष्ठेची शपथ देण्यात आली.

७७ जवान देशसेवेसाठी सज्ज; रिंकल सिंग सर्वोत्तम
बघा नजरेतून वाचता आलं तर...! तेजस्विनी पंडीतचा साडीतील किलर लूक एकदा पाहाच

यावेळी जवानांना मैकनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या समृद्ध वारशाची आणि अभिमानाची आठवण करून देण्यात आली. प्रामाणिकपणाने आणि निष्ठेने भारतीय सैन्यातील पूर्ण सैनिक म्हणून आपले कर्तव्य बजावण्याचे आवाहन करण्यात आले.

७७ जवान देशसेवेसाठी सज्ज; रिंकल सिंग सर्वोत्तम
नताशा पूनावालाच्या फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ....

रिक्रूट रिंकल सिंगला एकूण गुणवत्तेत प्रथम स्थान मिळाले आणि त्याला जनरल सुंदरजी सुवर्ण पदक, रिक्रूट आलोक सिंगला लेफ्टनंट जनरल केएल डिसूजा सिल्व्हर मेडल आणि रिक्रूट विशाल खंतवाल यांना लेफ्टनंट जनरल पंकज जोशी कांस्य पदक मिळाले. यावेळी जवानांच्या पालकांचा गौरव पदकाने सन्मान करण्यात आला.

Related Stories

No stories found.