अहमदनगर (प्रतिनिधी) -

बंद दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून त्यावर बसलेल्या तरूणाला टेम्पोची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. सचिन चंद्रकांत जाधव (वय- 35 रा. सुर्यानगर, तपोवन रोड, नगर)

असे मृत तरूणाचे नाव आहे. नगर- मनमाड रोडवरील अॅपेक्स हॉस्पिटलच्या समोर हा अपघात झाला. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात टेम्पो (एमएच 14 इएम 7480) चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश चंद्रकांत जाधव यांनी फिर्याद दिली आहे. नगर- मनमाड रोडवरील अॅपेक्स हॉस्पिटलच्या समोर सचिन जाधव त्यांच्या बंद दुचाकीवर बसले होते. यावेळी वेगात आलेल्या टेम्पो चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने त्याने सचिन बसलेल्या असलेल्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत सचिन यांचा मृत्यू झाला आहे.