अहमदनगर (प्रतिनिधी) - कोरोनाचा नगर जिल्ह्यासह शहरात आज विस्फोट झाला. सोमवारी जिल्ह्यात 857 बाधित आढळून आले असून त्यातील 291 हे नगर शहरातील आहेत. नगर शहरातील 1239 बाधितांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाधित होण्याचा शेकडा दर हा 17 टक्क्यांवर पोहचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गतवर्षी झालेल्या पहिल्या लॉकडाऊनला आज वर्षपूर्ती झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आजही जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतीच आहे. व्हॅक्सीन आले तरी कोरोनाचा कहर काही केल्या कमी होत नाही.

काल रविवारी जिल्ह्यात 857 नव्या बाधितांची भर पडून आकडा 85 हजाराच्या पुढे सरकला. जिल्ह्यात 79 हजार 894 बाधित ठणठणीत झाले असून साडेतीन हजार बाधित आजही रुग्णालयात उपचार घेत आहेत. नगर शहरातील 1 हजार 239 बाधित हॉस्पिटलमध्ये अॅडमीट आहेत. जिल्ह्यात 1 हजार 186 कोरोना बळी गेले असून त्यात नगर शहरातील 419 मृत्युचा समावेश आहे.

शहरात 19 मायक्रो कंटेनमेंट

नगर शहरात आजच्या दिवशी गतवर्षात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. आज कोरोनाचा कहर वाढत असला तरी प्रशासनाने मायक्रो कंटेनमेंट घोषित करत त्या त्या भागाची नाकाबंदी केली आहे. आज शहरात 19 कंटेनमेंट लागू करत कोरोनाचा अटकाव करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.

नगर सिटी कोरोना मीटर

बाधित - 23592

अॅक्टीव्ह - 1239

ठणठणीत - 21934

मृत्यू - 419