अहमदनगर (प्रतिनिधी)- भाड्याने चालविण्यासाठी घेतलेल्या अलिशान कार ढप करणार्या ‘उद्योगी’ला पोलिसांनी अटक करत त्याच्याकडून अडीच कोटीच्या कार हस्तगत केल्या आहेत. नगरच्या एलसीबी पथकाने ही कारवाई केली.

दादा उर्फ शशिकांत मारुती सातपूते (रा. भोयरे गांगर्डा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बीएमडब्ल्यू, इनोव्हा, झेस्ट, स्कॉर्पिओ अशा 16 अलिशान कार त्याने ढब केल्या होत्या. त्याच्याकडून त्या हस्तगत करण्यात एलसीबी पोलिसांना यश मिळाले आहे. पीआय अनिल कटके यांनी ही माहिती पत्रकारांना दिली.

महेश प्रताप खोबरे (रा. पिसोळ, पुणे) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. खोबरे यांचा टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे.

दादा उर्फ शशिकांत मारुती सातपुते याने खोबरे यांच्याकडून मार्च 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये इनोव्हा क्रिस्टा, इर्टिगा, झेस्ट, बीएमडब्ल्यू अशा 22 कार महाबली एन्टरप्रायजेस या नावाने भाड्याने चालविण्यासाठी घेतलेल्या होत्या. त्यातील 9 कार सातपुते याने खोबरे यांना परत केल्या. परंतू राहिलेल्या 13 कार व त्यांचे भाडे दिले नाहीत. कारबाबत सातपुते याने कोणतीच माहिती खोबरे यांना दिली नाही. त्यामुळे त्यांनी सुपा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

गुन्ह्याचे गांर्भीय आणि व्याप्ती लक्षात घेता एसपी मनोज पाटील यांनी हा तपास एलसीबीकडे दिला. एलसीबीच्या टिमने शशिकांत सातपुते याचा माग काढत त्याला पकडले. त्याच्याकडून सहा इनोव्हा क्रिस्टा (एमएच 12, क्युजी 7236), (एमएच 12,क्युजी 4950), (एमएच12,क्युजी 7236), (एमएच12, क्युडब्ल्यू 8628), (एमएच 12,क्युडब्ल्यू 8793), (एमएच12, पीक्यु 8515), टाटा झेस्ट (एमएच12, एसएफ 5292), स्विफ्ट (एमएच 14 जीडी 7487), तसेच या व्यतिरिक्त इतर ट्रॅव्हल्स कंपणीकडून घेतलेल्या एसक्रॉस कार (एमएच16,बीवाय 5640) स्कार्पिओ जीप (एमएच22, एडी 9111), इनोव्हा कार (एमएच17,एझेड 5464), बीएमडब्ल्यू (एमएच14, डीएक्स 5352), बीएमडब्ल्यू (एमएच43,एजे 0525) , बीएमडब्ल्यू (एमएच 02, बीजी 2100), बीएमडब्ल्यू (एमएच14,डीक्यू 9933), स्विफ्ट डिझायर (एमएच, 42, के 4328) आणि इनोव्हा (एमएच14, सीएक्स 8919) असा 2 कोटी 69 लाख रुपयांच्या 16 कार सातपुतेकडून हस्तगत केल्या. सपोनि सोमनाथ दिवटे हे अधिक तपसा करत आहेत.

एसपी मनोज पाटिल, एएसपी सौरभ कुमार अग्रवाल, डीवायएसपी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय अनिल कटके, सपोनि सोमनाथ दिवटे, पीएसआय गणेश इंगळे, सहाय्यक फौजदार नानेकर, पोलीस नाईक सुरेश माळी, रवि सोनटक्के, शंकर चौधरी, दिपक शिंदे, कॉन्स्टेबल रविन्द्र घुगासे, मयूर गायकवाड, रोहीत येमूल, रणजित जाधव, मेघराज कोल्हे, संदीप घोडके, शरद बुधवंत, उमाकांत गावडे, संभाजी कातेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

सावकारही चौकशीच्या फेर्यात

भाडोत्री घेतलेल्या कार सावकाराकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून सातपुते याने कर्ज उचलले होते. अनेक सावकारांना त्याने गाड्या गहाण दिल्या होत्या. आता पोलिसांनी त्या सावकारांचीही चौकशी सुरू केली आहे. सावकारांनी स्वत:हून सातपुते याने गहाण ठेवलेल्या कार पोलिसांच्या हवाली केल्या.